दूध उत्पादक शेतकरी GR

महाराष्ट्र राज्यातील लॉकडाउन काळात दुधाचे नियोजन करण्यासाठी प्रतिदिन १० लाख लिटर दुधाचे रूपांतर दूध पावडर मध्ये करण्याचा शासन निर्णय ३१ जुलै २०२० रोजी घेण्यात येऊन तो राबवण्यात देखील आला होता. त्याकरिता रुपये १९०.३० कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता.

त्यानंतर लॉकडाउन वाढल्याचे पाहून पुनश्च: दिनांक १ सप्टेंबर २०२० ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीकरिता राबवण्यात आला. त्यासाठी २१६.०६ कोटी इतक्या निधीस मंजुरी देण्यात आली. आत्ता सदर योजनेअंतर्गत २५ कोटी एवढा निधी वितरणासाठी वित्त विभागाने उपलब्ध करून दिला असल्याचे बाब महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या विचाराधीन होती. त्यामुळे हा शासन निर्णय घेण्यात आला.

शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेला रु. पंचवीस कोटी निधी राबवण्यात आलेल्या योजनेवरील खर्च भागवण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मंजूर निधीचा विनियोग दुग्धव्यवसायअतिरिक्त दुधाचे रूपांतर आणि निर्यातीकरीता अनुदान , दूध व दूध पावडर करीता अनुदान याकरिता अर्थसाहाय्य्य करण्यासाठी करण्यात यावा, असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे. तसेच सदर निर्णय १९ जानेवारी २०२१ मान्यतेवरून निर्गमित करण्यात आला आहे.